Ad will apear here
Next
रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सव यंदा ‘योद्धा भारत’ या विषयावर
दशकपूर्तीकडे वाटचाल; आठ ते १२ जानेवारीदरम्यान फुलणार देशभक्तीचा अंगार
रत्नागिरी : ‘योद्धा भारत’ म्हणजेच स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा आढावा हा या वर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवाचा विषय आहे. नवव्या वर्षात पदार्पण करतानाच दशकपूर्तीकडे वाटचाल करणारा कीर्तनसंध्या महोत्सव नव्या वर्षाच्या प्रारंभी, आठ ते १२ जानेवारी २०२० या काळात रंगणार आहे. 

या संदर्भात कीर्तनसंध्या परिवारातर्फे नुकतीच पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. रत्नागिरीत आठवडा बाजारानजीकच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ३२ फूट लांब आणि २० फूट रुंद असे भव्य व्यासपीठ, पाच हजार श्रोते सहज बसतील अशी प्रशस्त आसन व्यवस्था, तबला, पखवाज, हार्मोनियम, सिंथेसायझर, व्हायोलिन, तालवाद्ये यांच्या साथीने प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवांचे लाजवाब सादरीकरण हे नेहमीप्रमाणेच या वर्षीच्याही कीर्तनसंध्या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. दररोज सायंकाळी सहा ते १० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत.

कीर्तन म्हणजे समाजजागृती करण्याची महाराष्ट्रातील सर्वांत जुनी प्रभावी कला आहे. त्या परंपरेला अनुसरून रत्नागिरीत २०१२पासून दर वर्षी समाजप्रबोधन करण्याचे मोलाचे काम रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवार करत आहे. युवा पिढीवर चांगले, योग्य धार्मिक संस्कार रुजवणे, प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभावना जागवणे, इतिहासाचे खरे ज्ञान देणे, समाजाबाबतचा आदरभाव जागवणे, ही ध्येये समोर ठेवून कीर्तनसंध्या काम करत आहे. आतापर्यंत धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस, महाराणी ताराबाई, पेशवाईचा कालखंड, मराठ्यांचा इतिहास, भारताचे स्वातंत्र्यपर्व असे विविध विषय कीर्तनातून मांडण्यात आले आहेत. या वर्षी त्यापुढचा टप्पा जागवला जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्यापासून कारगिलपर्यंत जी युद्धे झाली, त्याचा इतिहास त्यातून मांडण्यात येणार आहे.

महोत्सवात आफळेबुवांना तबलासाथ हेरंब जोगळेकर, ऑर्गनसाथ वरद सोहोनी, पखवाजसाथ प्रथमेश तारळकर, सिंथेसायजरसाथ राजन किल्लेकर, व्हायोलिनसाथ उदय गोखले आणि गायनसाथ अभिजित भट करणार आहेत.

कंटाळवाणा वाटणारा इतिहास सुश्राव्य कीर्तनांतून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न कीर्तनसंध्या परिवारातर्फे केला जात आहे. आधी छोटेखानी स्वरूपात असलेला हा ज्ञानयज्ञ आता भव्यदिव्य स्वरूपाचा झाला आहे. अशा कार्यक्रमाला तितक्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज असते. समाजाच्या विविध घटकांकडून ती पुरविली जात आहे. या वर्षीही भरीव आर्थिक मदतीची गरज असून, त्यासाठी दात्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक मदतीचा एक भाग म्हणून देणगी सन्मानिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या सन्मानिका मानस जनरल स्टोअर्स (माळनाका, रत्नागिरी – ९०११६ ६२२२०), श्री धन्वंतरी आयुर्वेद (मारुती मंदिर – ९४२३२ ९२४३७), नितीन नाफड (मारुती मंदिर – ८३०८८ १३१५८), गुरुकृपा रेडिओ हाउस (टिळक आळी- ९८९०८ २७००६), गौरांग आगाशे (साळवी स्टॉप - ९७३०३१०७९९), सौ. लोवलेकर (जेल रोड – ९८२२० ७१२५०), श्रीकांत सरदेसाई (९४२११ ४२४९८), श्रीराम गोडबोले (पावस – ९४२१२ ३८८२४) येथे उपलब्ध आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZFJCH
Similar Posts
‘कीर्तनसंध्या’मधून उलगडणार स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय योद्ध्यांची कहाणी रत्नागिरी : स्वातंत्र्ययुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि प्रसंगी बलिदान करणाऱ्या योद्ध्यांची कहाणी या वर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवात उलगडणार आहे. ‘योद्धा भारत’ हा या वेळच्या कीर्तनांचा आख्यानविषय आहे. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांच्या
काश्मीरविषयीचे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय सर्वांत महत्त्वाचा रत्नागिरी : ‘काश्मीरला देशातला दुसरा देश म्हणून मान्यता देणारे ३७० कलम रद्द करणे हा भारतीय इतिहासातला सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. हे कलम रद्द केल्यामुळे काश्मीरसह देशभरात शांतता प्रस्थापित व्हायला मदत होईल,’ असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी रत्नागिरीत व्यक्त केले
राष्ट्रउभारणीसाठी वक्तृत्व आणि कर्तृत्वातून नेतृत्व घडवायला हवे रत्नागिरी : ‘समाजातील चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आणि त्या बाजूने बोलण्यासाठी धाडस आणि चांगल्या वक्तृत्वाची आवश्यकता असते. त्यातून कर्तृत्व घडत जाते आणि त्यातूनच टप्प्याटप्प्याने नेतृत्व घडते, जे राष्ट्रउभारणीसाठी अत्यंत आवश्यक असते. या कार्यामध्ये सध्या प्राध्यापकांचा सहभाग फारसा दिसत नाही
देशाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक शास्त्रीजींनी केला रत्नागिरी : ‘स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राइक दुसरे पंतप्रधान लालबहादूरशास्त्री यांनी केला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानची लष्करी ठाणी ताब्यात घेण्याचे कार्य त्यांच्या आदेशामुळे १९६५ साली साध्य झाले,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी रत्नागिरीत केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language